नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शैक्षणिक संस्थांच्या १०० मिटर परिसरामध्ये सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्या-या पानटप-यांवर धडक कारवाई करण्यात आली. आडगांव, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा व गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची पाहणी केली असता काही शैक्षणिक संस्थांच्या १०० मिटर परिसरात पानटपन्या असून सदर पानटपन्यांमध्ये सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ विक्री होत असल्याचे व त्या अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस व महानगरपालिकेने संयुक्त कारवाई केली.
या पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे महानगरपालिकेस विनंती करण्यात आली होती. यानुसार कारवाईसाठी पोलीस विभाग व महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून शैक्षणिक संस्थांच्या १०० मिटर परिसरात सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकुण २५ ते ३० पानटपऱ्यांवर कारवाई करून निष्काशित करण्यात आल्या.
या शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई
१) रचना विदयालय, शरणपुर, नाशिक २) रुंग्टा हायस्कुल, अशोकस्तंभ, नाशिक ३) अशोका इंटरनॅशनल स्कुल, अशोका मार्ग, नाशिक ४) रहनुमा स्कुल, पखाल रोड, कॅप्टन पेट्रोल पंप मागे, वडाळा पाथर्डीरोड, नाशिक ५) बी. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड, नाशिक ६) भोसला स्कुल, कॉलेजरोड, नाशिक ७) आर. वाय. के. कॉलेज, कॉलेजरोड, नाशिक ८) के. के. वाघ कॉलेज, पंचवटी, नाशिक ९) श्रीराम विद्यालय, वाघाडी, पंचवटी, नाशिक १०) म. न. पा. मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दु शाळा, घासबाजार, भद्रकाली, नाशिक ११) सारडा कन्या विद्यालय, नेहरू गार्डन, नाशिक १२) डी. डी. बिटको / वाय. डी. बिटको विद्यालय, न्यायालयासमोर, नाशिक १३) आदर्श मॉन्टेसरी बाल विद्या मंदिर, आदर्श माध्यमिक विद्यालय, सि. बी. एस. जवळ, नाशिक १४) रहेनूमा स्कुल, घासबाजार, भद्रकाली, नाशिक
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, नाशिक शहर, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा, पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार तसेच श्रीकांत पवार, उपायुक्त, म. न. पा. नाशिक, संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता, हर्षल बाविस्कर, उप संचालक, टाउन प्लॅनींग, हरिष चंद्रे, राजाराम जाधव, योगेश रकटे व नेहर, विभागीय अधिकारी, म. न. पा. नाशिक व पथक यांनी केलेली आहे. नाशिक शहरात यापुढे अशाच प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.