नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तश्रृंगी गडावरील रोपवे संकुल परिसरातील वरील ५ विक्रेत्यांकडे सुमारे १९४४ किलो स्वीट हलवा किंमत ५ लाक ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा अन्न पदार्थाचा साठा नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनने जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणारा, काही साठा मुदतबाहय असल्याने व नाशवंत असल्याने सप्तश्रृंगी गडावरील ग्रामपंचायतीच्या कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आला आहे. सदर प्रकरणी घेतलेले अन्ननमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
अचानक छापे टाकुन तपासणी केली असता सप्तश्रृंगी गडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभुल करुन मावा पेढे, कंदीपेठे, मलाई पेढे व कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थ्यांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलांकद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ विकत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या व्यवसायिकांविरुध्द जप्ती कारवाई करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
सदर कारवाई मध्ये अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक योगेश देशमुख, गो. वि. कासार, पी.एस. पाटील, अ.उ. रासकर, उ.रा. सुर्यवंशी, श्रीमती एस. डी. महाजन तसेच नमुना सहायक/शिपाई विकास विसपुते, सचिन झुरडे, विजय पगारे यांनी सहभाग घेतला सदर कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग सं.भा. नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहायक आयुक्त (अन्न) उ.सि. लोहकरे व म.मो. सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
प्रशासनातर्फे सर्व जनतेस व यात्रेचे ठिकाणी जाणा-या भाविकांना अवाहन करण्यात येते की, धार्मिक स्थळी म्हणून पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करून खरेदी प्रसाद करण्याची दक्षता घ्यावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थासंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन
सह आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन सं.भा. नारागुडे यांनी केले आहे.