इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी लोकांना दोन मोठ्या मसाल्यांच्या ब्रँडची चार उत्पादने न वापरण्याचा सल्ला दिला आहे. एमडीएचची तीन आणि एव्हरेस्टच्या एका उत्पादनात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर भारतीय खाद्य संरक्षा एवं मानक प्राधिकरण (FCCI) ने देश भरातून एमडीएच आणि एवरेस्ट सहित सर्व ब्रँण्डच्या मसाल्याचे नमुने घेणे सुरु केले आहे.
‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ने इथिलीन ऑक्साईडला ‘गट एक कार्सिनोजेन’ म्हणून वर्गीकृत केले आहे. पाच एप्रिल रोजी हाँगकाँगच्या अन्न नियामक प्राधिकरण केंद्र ‘फॉर फूड सेफ्टी’ ने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘एमडीएच’ची मद्रास करी पावडर, सांबार मसाला आणि करी पावडर मिश्र मसाला पावडर, तसेच एव्हरेस्ट फिश करी मसाले यात कीटकनाशक, इथिलीन ऑक्साईड असते.
‘एमडीएच’ आणि ‘एव्हरेस्ट’ या दोघांनीही अन्न नियामकांच्या दाव्यांवर अद्याप भाष्य केलेले नाही. त्याच्या नियमित तपासणीचा भाग म्हणून, ‘फॉर फूड सेफ्टी’ ने हाँगकाँगमधील तीन रिटेल आउटलेटमधून ही उत्पादने घेतली. चाचणीच्या निकालांवरून असे दिसून आले आहे, की नमुन्यांमध्ये कीटकनाशक, इथिलीन ऑक्साईड आहे. नियामकाने विक्रेत्यांना विक्री थांबवण्याचे आणि उत्पादने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.