इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: उच्च न्यायालयाने घोसाळकर खून प्रकरणात सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत. शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून झालेल्या हत्या झाली. त्यानंतर घोसाळकर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यावर उच्च न्यायालयाने सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत.
घोसाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात सांगितले की, मुंबई पोलिस या हत्याप्रकरणाच्या तपासात खूप घाई करत आहेत. पोलिसांनी घाईघाईत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत असते, तरीही मुंबई पोलिसांनी साठ दिवसांत तपास आटोपून आरोपपत्र दाखल केले. मूळ फिर्यादी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे म्हणणे मुंबई पोलिसांनी नीट ऐकून घेतले नाही.
त्यानंत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत सखोल तपासाचे निर्देश दिले. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करण्यासाठी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ताब्यात घेत सखोल चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी सहा मे रोजी होईल.