नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला असला तरी आता या जागेवरुन नवा ट्विस्ट समोर आला आहे. भुजबळांनी ही निवडणूक लढवावी याासाठी समता परिषदेने महत्वाची व तातडीची बैठक बोलावली आहे.
ही महत्वाची बैठक नाशिक शहर व जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बोलविण्यात आली आहे. मंगळवार, २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भुजबळ फार्म कार्यालय, नाशिक येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही बैठक तातडीने होण्याची दोन कारणे आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी दुपारी साताराची जागा सोडतांना राज्य सभेची एक जागा पदरात पाडून घेतल्याचे सांगितले. पण, त्याचबरोबर नाशिकच्या जागेवर अजून राष्ट्रवादीने दावा सोडला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वंचितने मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय गणितही बदलणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण, ही बैठक कशासाठी बोलावण्यात आली याचे कारण मात्र दिलेले नाही.
हे नेते राहणार उपस्थितीत
श्री.दिलीप खैरे,प्रदेश उपाध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
श्री.बाळासाहेब कर्डक,प्रदेश उपाध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
श्री.समाधान जेजुरकर,प्रदेश चिटणीस,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
सौ.कविताताई कर्डक,नाशिक शहराध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
श्री.डॉ.योगेश गोसावी,जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
श्री.प्रा.ज्ञानेश्वर दराडे,जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
सौ.पूजा आहेर,महिला जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
सौ.आशा भंदुरे,महिला शहराध्यक्ष,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद