इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सुरत लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदरवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहे. या जागेवर काँग्रेस उमेदवार निलेश कुम्भानी यांचा अर्ज रद्द ठरवण्यात आल्याने या निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर या निवडणुकीत आठ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
निवडणुकीत कोणीच उमेदवार नसल्यामुळे अखेर दलाल हे विजयी झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही देण्यात आले. अपक्ष आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.
या कारणाने रद्द झाला उमेदवारी अर्ज
दोन दिवसापूर्वी येथे मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे उमेदवार कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावरील सह्या आमच्या नाहीत असे सूचकांनी सांगितले होते. त्यानंतर भाजपचे दिनेश जोधानी यांनी निवडणूक अधिका-याकडे तक्रार केली. त्यांनतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला.