नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम साईटवरील काम बंद पाडून सदनिका विक्री करू देणार नाही अशी धमकी देत एकाने बांधकाम व्यावसायीकाकडे दहा लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर भारती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत बांधकाम व्यावसायीक प्रमोद बाळकृष्ण गोरे यांनी फिर्याद दिली आहे. गोरे यांच्या नाशिकरोड भागात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असून संशयिताने रविवारी (दि.२१) गोरे यांच्याशी संपर्क साधत धमकी दिली.
बांधकाम साईटवरील काम बंद पाडून एकही सदनिका विक्री करू देणार नाही अशी धमकी देत त्याने खंडणी मागितली. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.