नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तवलीफाटा भागात खेळतांना तोल जावून पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जिग्नेश निलेश सिसोदिया (रा.मेघराज बेकरी जवळ,तवलीफाटा) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिग्नेश रविवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात खेळत असतांना अचानक तोल जावून पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास व तोंडास दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.शुभम भसनागर यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार संजय गवारे करीत आहेत.