इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा एमआयएमने दिला असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शाहू महाराजांना याअगोदर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर महाविकास आघाडी व्यतिरिक्त या दोन पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे शहू महाराज यांची ताकद वाढली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवेसना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या बरोबर थेट सामना आहे. त्यात या दोन पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे दलित, मुस्लिम मतांचा फायदा छत्रपती शाहू महाराजांना होणार आहे. एमआयएमने पाठिंबा देतांना सांगितले की, कोणी आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. तो आम्हीचा दिला आहे.