इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ येथील वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडल्याचे यासमयी सांगितले. खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, मात्र हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरून फिरणाऱ्या शेळ्यांना चांगला ओळखून असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण सर्वांनी असा आदर्श लोकप्रतिनिधी लोकसभेत पाठवला असल्याचे गौरवोद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की, रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका, कल्याण यार्ड रिमोडलींग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म, काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे, रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत मार्ग, माणकोली-मोठागाव उड्डाणपूल, ऐरोली काटई फ्रि वे, भिवंडी-तळोजा मेट्रो असे गेमचेंजर प्रकल्प झाले.
बाळासाहेबांचे आशिर्वाद, मोदीजींनी दाखवलेला विश्वास आणि आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे इतकी डोंगराएवढी कामे करणे शक्य झाल्याचे याप्रसंगी सांगितले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांची गाडी नुसती राईट ट्रॅकवरच नाही तर फुल्ल स्पीडमध्ये सुरू आहे. आज तो नुसता खासदार नाही तर संसदरत्न असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
आज मी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदारांचा पिता अशा तिहेरी भूमिकेत तुमच्यासमोर उभा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.