नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावरुन झालेली मैत्री फारशी टिकत नाही याचे अनेक प्रकार समोर येत असतांना फेसबुकमुळे जुळलेली मैत्री नागपूरमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. या मैत्रीत प्रियकराने असे कृत्य केले की त्याच्यावर थेट बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशीकी, फेसबुकमुळे दोन जण एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर प्रेमाचे रुंपातर झाले व पुढे शारीरिक संबध प्रस्तापित झाले. पण, त्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या प्रेयसीने आईवडिलांनी शोधलेल्या युवकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पण, हळदीच्या दिवशी प्रियकराने प्रेयसीला फोन करुन लग्न न करण्याची धमकी दिली. प्रेयसीने नकार दिल्यानंतर प्रियकराने थेट नवरदेवाच्या मोबाईलवर अश्लिल छायाचित्र व चित्रफिती पाठवली व त्यानंतर हळदीच्या दिवशीच लग्न मोडले.
लग्न मोडल्यामुळे प्रेयसी प्रचंड संतापली व तीने थेट पाचपावली पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानंतर प्रियकराविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. २७ वर्षीय प्रियकराचे नाव शुभम पाटील असून तो रामटेकचा असून नागपूर येथे तो कंपनीत नोकरी करतो.