इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या मशाल गीतावरुन निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले आहे. कारवाई करायची तर करा. पण आम्ही भवानी हा शब्द काढणार नाही. भवानी माता आमची अस्मिता आहे. अस्मितेशी तडजोड नाही असे सांगत थेट आव्हान दिले आहे.
यावेळी त्यांना सागंतिले की, आम्ही जे गीत दिलं होतं त्या गीतात त्या गाण्याचा जोश वाढतोय. कोरसला जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढा. हा लेखी फतवा आला आहे. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आज जय भवानी शब्द काढायला सांगितलं, उद्या जय शिवाजी हा शब्द काढायला सांगाल. आम्ही त्याविरोधात लढत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आयोगाला ठणकावले.