इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोन गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात सायंकाळच्या सुमारास शनिवारी झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.
या अपघातामध्ये नांदुर-शिंगोटे येथील वाशी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (३०), युवराज धोंडीबा मेंगाळ (२९) हे दोघेही राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर व संदीप सोमनाथ आगविले राहणार गर्दनी तालुका अकोले हे तिघे मोटरसायकलने जात असताना कंटेनरने पल्सर मोटरसायकला धडक दिली.
त्यात मोटरसायकल वरील तिघांचा मृत्यू झाला. नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेऊन त्वरित बचाव कार्य केले. मात्र सदरचे तिन्ही तरुण जागेवरच ठार झाले. रविवारी सकाळी नांदूर शिंगोटे येथे दोघांवर व एकावर गर्दनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.