इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भगवान महावीर जयंतीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे, भगवान महावीर जयंतीच्या या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना, विशेषतः जैन समुदायाच्या बांधवांना शुभेच्छा देत आहे.
महावीर जयंती हा भगवान महावीर यांचा जन्मदिवस अहिंसा आणि करुणा यांचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. भगवान महावीर यांनी एका आदर्श आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी अहिंसा, ब्रह्मचर्य, सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण मानव जमातीच्या कल्याणासाठी नेहमीच संयुक्तिक राहील.
या प्रसंगी आपण सर्वांनी समाजात प्रेम आणि सौहार्द पसरवण्याचा आणि देशाच्या विकासाकरिता समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करुया”