नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरातील जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना विहीतगाव येथे घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उत्कर्ष राजू गांगुर्डे (रा.कोठूळे मळा,विहीतगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गांगुर्डे गेल्या २६ मार्च रोजी आपल्या राहत्या घरात जीन्याच्या पायरीवर पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जयराम हॉस्पिटल मार्फ त्यांना मुंबईच्या सायन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना २९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत फकिरचंद्र शिरसाठ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बरेलीकर करीत आहेत.
६० वर्षीय वृध्दाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंजाबाबारोड भागात राहणा-या ६० वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रावण हिलाल सुर्यवंशी (रा.मटन मार्केट,मुजाबाबारोडृ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुर्यवंशी यांनी गुरूवारी (दि.१८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलगा विलास सुर्यवंशी यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.