अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अनुषंगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज दि. २० एप्रिल, २०२४ रोजी ०९ जणांना -२२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. आजच्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार २५ एप्रिल, २०२४ अशी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, अहमदनगर यांनी दिली आहे.
शिर्डीतही एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
शिर्डी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शनिवार, २० एप्रिल २०२४ रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. आजच्या तिसऱ्या दिवशी १२ व्यक्तींनी २३ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रे भरण्यास १८ एप्रिल २०२४ पासून सुरूवात झाली. मागील तीन दिवसात आतापर्यंत ४८ इच्छूक उमेदवारांनी ८९ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. नामनिर्देशन पत्रे प्राप्त करून घेतलेल्यांपैकी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी १९ एप्रिल रोजी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उर्वरित ४७ नावे इच्छूक उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
सतिष भिवा पवार, संजय हरिश्चंद्र खामकर, बाळासाहेब हिरामण भोसले, ॲड. सिध्दार्थ दिपक बोधक, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजित अशोकराव पोटे, डॉ.जयंत दामोदर गायकवाड, चंद्रकांत सखाराम बागुल, चंद्राहार त्र्यंबक जगताप, ॲड.नितीन दादा हरी पोळ, प्रशांत वसंत निकम, किशोर दादू वाघमारे, सुधाकर प्रभाकर रोहम,राजेंद्र सखाराम घायवट, शंकर संभाजी भारस्कर, संदीप सिताराम घनदाट, अशोक अनाजी वाकचौरे, गोरक्ष तान्हाजी बागुल, राजू नामदेव कदम, रामचंद्र नामदेव जाधव, सदाशिव किसन लोखंडे, दिलीपराव भाऊसाहेब गायकवाड, उत्कर्षा प्रेमानंद रूपवते, विशाल बबनराव कोळगे, योगेश रविंद्र जाधव, यशवंत रामा म्हस्के, योहान रोहीदास साळवे, रविंद्र नाना पारखे, संजय पोपट भालेराव, बबन लहानू गवळी, विश्वास दादासाहेब माघाडे, विजयराव गोविंदराव खाजेकर, गंगाधर राजाराम कदम, अश्विनी चंद्रकांत दोंदे, नचिकेत रघुनाथ खरात, विनोद मारूती अहिरे, नितीन नवनाथ उदमले, संतोष तुळशीराम वैराळ, रावसाहेब रामचंद्र गायकवाड, शरद केरू खरात, चंद्रकांत केरू खरात, जयाबाई राहूल डोळस, बाबासाहेब मुरलीधर आंबेडकर, डॉ.अशोक बाजीराव म्हंकाळे, प्रशांत सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे व प्रथमेश विलास गोतीस अशी नामनिर्देशन पत्रे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.