इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राहुल गांधी अमेठीप्रमाणेच वायनाडमध्ये संकटत आहेत. त्यांचा पराभव अटळ आहे. २६ तारखेला वायनाडमध्ये मतदान झाल्यानंतर राहुल यांच्यासाठी आणखी आणखी एका जागेचा शोध घेतला जाईल. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दाखल देत काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीला टोला लगावला. काँग्रेसचा परिवार या निवडणुकीत काँग्रेसला मत देणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, जिथे ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. चार जूननंतर ‘इंडिया’ आघाडी एकमेकांविरोधात लढत आहे. हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
नांदेडमधील सभेत बोलताना मोदी यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वाना राम राम.. नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार. २६ तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत मोदी यांनी स्थानिकता जपण्याचा प्रयत्न केला. माजी मु्ख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी जागवत नांदेडकरांशी स्थानिक नाळ जोडली. पहिल्या टप्प्यात ‘एनडीए’ला एकतर्फी मतदान झाले असून याच मतदानातून देशाचे भविष्य ठरते, असे सांगून मोदी यांनी काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीवर टीका केली. गरीब, शेतकरी, मजदूर आणि सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड काँग्रेसकडून भिंत टाकली जाते. आजही ‘एनडीए’ सरकारच्या गरीबांच्या विकासकामांची खिल्ली उडवली जाते, असे ते म्हणाले.