शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नांदेड,परभणी येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी केले विरोधकांवर घणाघाती हल्ले…

by Gautam Sancheti
एप्रिल 20, 2024 | 6:09 pm
in मुख्य बातमी
0
GLmmif WAAAvJQG

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला प्रेम दिले, माझ्यावर विश्वास टाकला,आणि मला भरभरून आशीर्वाद ही दिले, पुढील काळात देशाचा वेगवान विकास करून मी याची परतफेड करेन, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली.

‘महायुती’ चे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर (रासप) यांच्या प्रचार सभांमधून मराठवाड्यातील मतदारांशी संवाद साधताना मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानातून ‘एनडीए’ च्या विजयाची खात्री अधोरेखित झाल्याचा विश्वासही व्यक्त केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वत्र ‘एनडीए’ ला एकतर्फी मतदान झाले असून निवडणुकीआधीच पराभूत मानसिकतेत असलेल्या इंडी आघाडीकडे निवडणूक लढण्याची उमेद नाहीच आणि अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीत, अशी टीका त्यांनी केली. नांदेड येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे आदी उपस्थित होते. परभणी येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.

आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांचा परस्परांवर विश्वास नाही आणि देशातील जनतेवरही विश्वास नाही. देशातील २५ टक्के मतदारसंघांत या आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्यांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यांच्यावर देशातील जनतेने विश्वास का ठेवावा, असा सवाल करून, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदारांनी नाकारले आहे, असे श्री.मोदी म्हणाले. ४ जूनला निवडणुकीच्या निकालानंतर या आघाडीचे नेते एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील असे भाकितही त्यांनी वर्तविले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी परखड टीका केली. अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी वायनाडमध्ये आले, पण तेथेही त्यांना पराभव चाखावा लागणार असून वायनाडमधील मतदान पार पडल्यानंतर पळ काढून दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे, असे ते म्हणाले. ज्या परिवाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, त्या परिवाराचा स्वतःवरच भरवसा राहिलेला नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचा गरीबांवर विश्वास नाही, त्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटला, त्यांच्यामुळे शेतकरी, गरीब दुबळा झाला, उद्योग विकासाला खीळ बसली, लाखो तरुणांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात लाखो घरांना नळाचे पाणी मिळू लागले आहे. पीक विम्याची हमी शेतकऱ्यांना मिळाली आहे,किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे ओझे हलके झाले,भरड धान्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिल्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मोठे लाभ मिळणार आहेत, असेही श्री.मोदी म्हणाले.

काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर आम्ही इलाज आणि उपचार करू, ही मोदींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देऊन ,त्यांनी मराठवाडा विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे ही तर केवळ सुरुवात आहे, पुढच्या पाच वर्षांत विकासाची कामे अधिक गतिमान होतील, असेही श्री. मोदी यांनी सांगितले. ३७० च्या जाचातून काश्मीरची मुक्तता, तिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्तता, देशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी ही आमची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी ‘एनडीए’ च्या उमेदवारांना विजयी करा. कारण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना ताकद देणार असून विकासाला बळ देतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 2024 ची निवडणूक केवळ सरकार बनविण्यासाठी होणारी निवडणूक नाही, तर भारताला समृद्ध आणि विकसित बनविणे हे या निवडणुकीचे लक्ष्य आहे. देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असून कोणीही कितीही अडथळे आणले तरी आता माघार नाही, देशातील जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांची पूर्तता करणे हाच आमचा संकल्प आहे, असा निर्धार ही श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोन्याच्या दरात मोठी वाढ, ओलांडला इतक्या हजारांचा टप्पा…आजपर्यंतचा उच्चांकी भाव

Next Post

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज चोरुन नेला…कामटवाडा भागातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज चोरुन नेला…कामटवाडा भागातील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011