इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून ७६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. लग्नसमारंभात सोने खरेदी करणा-यांच्या खिशावर आता मोठा भार पडणार आहे. आजपर्यंतचा सोन्याच्या भावाचा हा उच्चांक भाव आहे. जळगावमध्ये जीएसटीसह सोन्याचे दर ७६ हजार ३०० रुपये आहे. तर चांदीचे दर ८५ हजार ५०० रुपयापर्यंत प्रति किलो पोहचले आहे.
गेल्या काही सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांच्या आसपास वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे लोक पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोन्याच्या दराने ७६ टप्पा ओलांडल्यानंतर सोने खरेदी करण्याचा कल कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
१४ ते २४ कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. २४ कॅरेट सोने ७३,४०४ रुपये, २३ कॅरेट ७३,११० रुपये, २२ कॅरेट सोने ६७,२३८ रुपये झाले. १८ कॅरेट ५५,०५३ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,९४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव ८२,८५३ रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.