केंद्र सरकारने 25 ऑक्टोबर 2023 च्या S.O. 4701(E) या अधिसूचनेनुसार भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या 11 सदस्यांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याने भारतीय पशुवैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी झालेल्या भारतीय पशुवैद्यांमधून या सदस्यांची निवड करण्याकरिता निवडणूक घेण्यासाठी खालील तारखा निर्धारित केल्या आहेत.
कार्यक्रम | तारीख आणि वेळ |
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख | 20.04.2024 (शनिवार) ते 26.04.2024 (शुक्रवार) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 |
उमेदवारी अर्जांच्या छाननीची तारीख आणि वेळ | 01.05.2024 (बुधवार) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 |
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 03.05.2024 (शुक्रवार) संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत |
मतदानाची तारीख | 08.06.2024 (शनिवारी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00) |
मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण | 09.06.2024 (रविवारी सकाळी 10.30 वाजल्यापासून) नवी दिल्ली |
पात्र उमेदवारांनी भारतीय पशुवैद्यकीय परिषदेची निवडणूक लढवण्याकरिता त्यांचे अर्ज विहित नमुन्यात न्यायमूर्ती (श्रीमती) आशा मेनन (निवृत्त), पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकरिता निवडणूक अधिकारी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, केबिन क्रमांक 5, चंद्र लोक बिल्डिंग (दुसरा मजला), जनपथ रोड, नवी दिल्ली येथे, जाहीर तारीख आणि वेळेनुसार किंवा त्यापूर्वी पाठवावेत किंवा सादर करावेत.
पात्र उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज (उमेदवाराची आणि अनुमोदक/प्रस्तावकाची स्पष्ट स्वाक्षरी असलेल्या स्कॅन्ड प्रतिसह) निवडणूक अधिकाऱ्याकडे ro.vcielection[at]gmail[dot]com या ई-मेल आयडीवर उशिरात उशिरा शेवटच्या तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवता येतील. 26.04.2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजल्यानंतर आलेले कोणतेही उमेदवारी अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
या संदर्भातील राजपत्र अधिसूचनेचे पालन करण्यात येत आहे आणि भारतीय असाधारण राजपत्रात आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेचे पालन करण्याची विनंती सर्वांना करण्यात येत आहे.