नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंजमाळ ते सारडा सर्कल दरम्यान भरधाव महेंद्रा थार वाहनाने दिलेल्या धडकेत स्कुटीस्वार ठार झाला. या अपघातात एक अल्पवयीन युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैफुद्दीन उर्फ चांद हदिष अन्सारी असे मृत स्कुटी चालकाचे नाव असून या अपघातात इरफान शाफिक अन्सारी (१३ रा.खडकाळी) हा मुलगा जखमी झाला आहे. सैफुद्दीन व इरफान हे दोघे मित्र शुक्रवारी (दि.१९) गंजमाळकडून सारडा सर्कलच्या दिशेने आपल्या स्कुटी पेप या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या महिंद्रा थार या वाहनाने पुढे जाणा-या स्कुटीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील स्कुटी चालक सैफुद्दीन अन्सारी याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शफिक अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी चालक दीपक कपिले (रा.रविवार कारंजा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.