नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियाच्या माध्यमातून आ. प्रा. देवयानी फरांदे यांना देण्यात येणाऱ्या धमक्या व जाहीर सभातून करण्यात येत असणारी बदनामी थांबविणे संदर्भात पोलीस आयुक्त नाशिक यांना भाजप व सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. उपनगर भागात समाजकंटकांनी ३ एप्रिल २०२४ रोजी धुमाकूळ घातला होता. “गुस्ताख ए – नबी कि – एक हि – सजा – सर तन से जुदा – सर तन से जुदा” अशा प्रकारच्या घोषणा देवून सामाजिक वातावरण बिघडवून अनेक सार्वजनिक मालमत्तांचे तसेच हिंदू नागरिकांचे नुकसान करण्यात आलेले होते.
या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेली होती. या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच आचारसंहिता सुरू असताना देखील सदर प्रकरणाला धार्मिक स्वरूप देऊन मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ.प्रा.देवयानी फरांदे यांच्या जीवीताला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण गरजेचे आहे. असे यावेळी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आ.प्रा. देवयानी फरांदे यांना समाज माध्यमातून धमकी देणाऱ्या व्यक्तींवर सक्त कारवाई करण्यात यावी व आ.प्रा. देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. नाशिक शहर शांतता प्रिय व धार्मिक शहर असून या शहरांमध्ये अशा घटना घडणे अत्यंत खेदजनक आहे. यापूर्वी अशा घटना कधीही या शहरात घडल्या नव्हत्या. शहरातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने व सलोख्याने राहत होते. ही घटना शहराला काळीमा फासणारी आहे. शहराच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान असलेल्या लोकप्रिय व महिला आमदारांना धमकी येणे ही गंभीर बाब आहे. यांची सखोल चौकशी करून यामाघील सूत्रधाराचा शोध घेउन कठोर कायदेशीर कार्यवाही करावी. उपस्थित भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते