इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड लोकसभा मतदार संघातून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख व मराठा आरक्षणसाठी लढा देणा-या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे या उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची माहित समोर आली आहे. त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे आज पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे रिंगणात आहे.
ज्योती मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे मागणी केली होती. पण, पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढवणार अशी चर्चा होती. पण, त्यांनी आज अचानक निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. आता त्यांची संघटना कोणाला पाठींबा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असे मेटें यांनी सांगितले.