मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाणा-या राजकारण विरहित असलेल्या बारा बलुतेदार मित्र मंडळाने अनोखा उपक्रम राबविला आहे.
तालुक्यातील मंदिराची स्वच्छता राखणारे, सर्वसामान्य कुटुंबातील टाळकरी, मृदंग वादक, किर्तनकार यांना कधीही चार धाम यात्रेला जाता आले नाही. अशा निवडक लोकांना बाराबलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी दोन धाम यात्रेसह अयोध्या वारीला पाठविले असून या सर्वांना पाठवितांना त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांची मालेगाव ते चंदनपुरी पर्यंत शोभायात्रा काढत तेथून त्यांना निरोप देण्यात आला.२१ दिवस हे सर्व यात्रेकरू दोन धाम सह अन्य धार्मिक ठिकाणी जाऊन देवदर्शन घेणार आहे. एकुणच बारा बलुतेदार संघटने तर्फे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.