इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात प्रचाराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय झालं व काय ठरलं याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. या शपथविधीबाबत अंदर की बात अजित पवारांनी कधीच सांगितली नाही. पण, त्यांनी या कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पटच उलगडून सांगितला.
ते म्हणाले की, देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचे हे ठरले. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी ८ वाजता शपथ घेण्याचे ठरले, मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकले नाही, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
खरं तर या शपथविधी याअगोदर देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा काही माहिती दिली होती. पण, ते विरोधी असल्यामुळे त्या वक्तव्यांकडे राजकीय टीका म्हणून बघितली जात होती. पण, आता खुद्द अजित पवार यांनीच पट उलडगल्यामुळे आता शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे आहे.