अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अनुषंगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास काल १८ मार्च पासून सुरूवात झाली आहे. काल व आज दोन्ही दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही. आज १९ एप्रिल, २०२४ रोजी २० जणांना ४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले.
सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार २५ एप्रिल, २०२४ अशी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, अहमदनगर यांनी दिली आहे.
शिर्डी -लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ रोजी १ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. आजच्या दिवशी १९ व्यक्तींनी ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे १९ एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे)