इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात पोलिसांना धमकी देणारे शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे एक चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांनी दिलेली ही धमकी थेट पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद करुन घेतली. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
ही धमकी देण्याचे कारणही समोर आले आहे. पोलिसांनी दुचाकी विरुध्द मोहिम उघडल्यानंतर एक विना नंबरची दुचाकी पोलिसांनी अडवली. नेमकी ही दुचाकी एका माजी नगरसेवकाची होती. त्याने पोलिसांनी दुचाकी सोडण्याचे सांगितले. पण, पोलिसांनी ती दुचाकी पोलीस ठाण्यात नेली.
यानंतर नगरसेवकाने संतापात आमदारांना फोन केला. मग, आमदारांनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला फोन केला. पण, या फोनचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी दुचाकी सोडण्यास नकार दिला त्यामुळे आमदार चांगलेच संतापले.
त्यानंतर आमदारांनी दुचाकी सोडा नाही तर सस्पेंड करतो अशी धमकीच पोलिस उपनिऱीक्षकाला दिली. इतक्यावरच ते थांबले नाही. अधिवेशनात तारांकीत प्रश्न विचारू, तुमच्यावर कारवाई करू असेही सांगितले. त्यांनंतर पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये या धमकीची नोंद केली.