नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पूर्व वैमनस्यातून एकाने जातीवाचाक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर उर्फ विशाल यशवंत वारूळे (४२ रा.मोदकेश्वर सदन,कलानगर दिंडोरीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सचिन शंकर साळवे (रा.शिवाजीनगर,म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. साळवे सोमवारी (दि.१५) जिल्हान्यायालय परिसरात गेले होते.
प्रवेश द्वाराजवळील फुटपाथवर ते उभे असतांना वारूळे याने त्यांना गाठले. यावेळी संशयिताने पूर्व वैमनस्यातून जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.