नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनात पार्क केलेल्या भाविकांच्या वाहनातून चोरट्यांनी बॅग लांबविल्याची घटना घडली. या बॅगेत सुमारे दीड लाखाचे दागिणे होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरिता रामदास जाधव (रा.कल्याण) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव कुटुंबिय बुधवारी (दि.१७) देवदर्शनासाठी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते तपोवनात देवदर्शन करीत असतांना ही घटना घडली. स्वामी नारायण मंदिराकडे जाणा-या मार्गावर पार्क केलेल्या झायलो (एमएच ०४ जीई ६९८३) वाहनाचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बॅगसह स्टीलची शेगडी चोरून नेली.
या बॅगेत सुमारे १ लाख ४७ हजार ७०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार होते. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.