इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्रंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपासच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने पेढा व स्पेशल बर्फी विक्रेत्यांकडे अचानक कारवाई केली. येथे भेसळयुक्त मावा सदृश्य स्पेशल बर्फीपासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करुन विक्री होत असल्याचे आढळले. सदर ठिकाणी मे. भोलेनाथ स्विटस्, मेनरोड, त्रंबकेश्वर येथून एकुण ७८ किलो कुंदा (लूज) किंमत ३७ हजार ४४० रुपये, श्री. नित्यानंद पेढा सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्रंबकेश्वर येथून स्विट हलवा (शाम) २२ किलो किंमत ६ हजार ६०० रुपये तसेच हलवा (ग्वाल) १३ किलो किंमत ३ हजार ९०० रुपये, मे. भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भंडार, उत्तर दरवाजा, त्रंबकेश्वर येथून हलवा (ग्वाल) २२ किलो, किंमत ६ हजार ६०० रुपये असा एकूण किंमत ५४ हजार ४४० रुपयाचा कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेढे व कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावा सदृश्य अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. तो नाशवंत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या घंटागाडी मध्ये टाकून कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातर्फे धार्मीक स्थळाच्या यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभुमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त, मिथ्याछाप अन्न पदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहिम हाती घेतली आहे. जनतेस दर्जेदार व भेसळीरहीत अन्न पदार्थ मिळवेत या करीता अन्न व औषध प्रशासन हे जागरुक असुन त्याचाच भाग म्हणुन प्रशासनाद्वारे गुरुवारी त्रंबकेश्वर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील तसेच श्रीमती अश्विनी पाटील यांनी अचानक छापे टाकुन तपासणी केली असता
सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही घेण्यात येईल. सदर कारवाई मध्ये अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक गो. वि. कासार, योगेश देशमुख, पी.एस. पाटील, अ.उ. रासकर, श्रीमती ए.ए. पाटील, उ.रां. सुर्यवंशी, श्रीमती सा.सु. पटवर्धन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी, धुळे कि.हि. बाविस्कर व अन्न सुरक्षा अधिकारी, नंदुरबार आ.भा. पवार यांनी सहभाग घेतला सदर कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग, सं.भा. नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहायक आयुक्त (अन्न) उ.सि. लोहकरे व श्री. म.मो. सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
प्रशासनातर्फे सर्व जनतेस व भाविकांना अवाहन करण्यात येते की, धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा.