इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल असे जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. साताराची जागा राष्ट्रवादीने भाजपाल सोडल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याचे निश्चित झाले होते. पण, शिंदे गटाचे विदयमान खासदार या ठिकाणी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला देऊ नये असा आग्रह सुरु होता. त्यानंतर त्यासाठी अनेक वेळा खासदारांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे.
अखेर भुजबळांची माघार
नाशिकची जागा लढवण्यासंदर्भात छगन भुजबळ यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी सांगितल्याचे बोलले जात होते. त्यानंतर भुजबळांनी तयारी सुरु केली होती. परंतु पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून भुजबळ यांनी लढावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश असल्याचे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर या जागेवरचा तिढा काही सुटला नाही. त्यामुळे अखेर भुजबळांनी माघार घेत असल्याची घोषणा केली.