इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गांधीनगर येथील सीबीआय न्यायालयाने तत्कालीन इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वरिष्ठ व्यवस्थापक यांना १५ कोटी रुपये दंड ठोठावत सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रीती विजय सहजवानी हे आरोपीचे नाव आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वस्त्रापूर शाखा, अहमदाबाद मध्ये त्या कार्यरत होत्या.
बनावट कागदपत्राचा वापर करुन बँकेचे चुकीचे नुकसान केल्याप्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक यांनी २९ जानेवारी २००१ मध्ये केलेल्या तक्रारीवरुन फसवणूक केल्याच्या आरोपावरून, गुन्हा दाखल केला होता. २ कोटी १४ लाऱ ९३ हजार ९४० रुपये (अंदाजे) दोन खात्यांच्या FCNR ठेवींचे अंतिम मॅच्युरिटी पेमेंट दोन काल्पनिक खात्यांमध्ये जमा करून ठेवीदाराकडून किंवा मुखत्यारपत्र धारकाकडून कोणतेही अधिकार पत्र न घेता आणि काल्पनिक स्वरूपात मंजूर मागणी कर्ज/कॅश क्रेडिट्स रुपयाची खाती १ कोटी ४० लाख ५० हजार (अंदाजे) रक्कम, तारीख, मुदतपूर्ती मूल्य इ. मध्ये बदल करून, वास्तविक ठेवीदारांच्या अ-समर्पण केलेल्या ठेव पावतींच्या सुरक्षिततेच्या विरूद्ध काम केल्याचे त्यात म्हटले होते. या सर्व प्रकरणाता सीबीआयाने तपास पूर्ण झाल्यानंतर, १५ ऑक्टोंबर २००३ रोजी दोषी आरोपींविरुद्ध विश्वासाचा भंग, मौल्यवान सुरक्षा खोटी, बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे, आणि गुन्हेगारी गैरवर्तन इत्यादी गुन्ह्यांसाठी दोषारोपपत्र दाखल केले होते.
तपासादरम्यान आरोपी श्रीमती प्रीती विजय सहजवानी फरार झाल्या होत्या. त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर त्यांना कॅनेडियन इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ११ जानेवारी २०१२ ला सहजवानी यांना भारतात पाठवले. त्यानंतर अहमदाबाद येथील सीबीआयच्या स्पेशल कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. त्यावेळेस सहजवानी यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. खटल्या दरम्यान, फिर्यादी पक्षाच्या २३ साक्षीदार तपासण्यात आले आणि १५८ कागदपत्रे साक्षीदारांद्वारे सिद्ध झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपी प्रीती विजय सहजवानी यांना ताब्यात घेण्यात आले.