इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव लोकसभेमध्ये भाजपच्या विद्यमान खासदाराने बंड करत शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील गणित बदलले आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथे भाजप व ठाकरे गटात थेट लढत होणार आहे. लोढा यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतली आहे.
लोढा म्हणाले की मतदारसंघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आणि कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.