इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक मतदार संघात जमवून घेणं भाजपच्या आमदारांना अवघड झाले आहे. तर काही ठिकाणी स्वपक्षाचा उमेदवारावर नाराजी आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका उमेदवाराला बसू नये यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन ४५ प्लस’अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. त्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना विशेष टार्गेट दिले आहे.
जो आमदार हे टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येणार आहे. जो आमदार लोकसभा निवडणुकीत मताधिक्य देईल, ज्याच्या मतदारसंघात कमी मताधिक्य मिळेल, त्याचे आमदारकीचे तिकीट धोक्यात येणार असल्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे आता उमेदवाराशी मतभेद असले, तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना काम करण्याची वेळ आली आहे.