बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

by India Darpan
एप्रिल 18, 2024 | 7:34 pm
in राष्ट्रीय
0
image001QXWW

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर ), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम ) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम (EOTS) आणि आयटीआर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले,ज्यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला.तसेच भारतीय हवाई दलाच्या सुखोई (Su-30-Mk-I)विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले.

क्षेपणास्त्राने वे पॉइंट नेव्हिगेशनचा (दिशादर्शन) वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. या यशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे.

अधिक उत्तम आणि विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक वैमानिकी तंत्रे आणि सॉफ्टवेअर यांनी देखील सुसज्ज केले आहे.बेंगळूरूस्थित डीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास आस्थापनेने (एडीई) इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले.सदर चाचणीच्या वेळी विविध डीआरडीओ प्रयोगशाळांतील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच उत्पादन भागीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयटीसीएमच्या यशस्वी उड्डाण-चाचणीसाठी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.भारतीय बनावटीच्या प्रॉपल्शनने(प्रणोदन) सक्षम अशा दीर्घ पल्ल्याच्या स्वदेशी सबसोनिक(अवस्वनी) क्रुझ क्षेपणास्त्राचा विकास हा भारतीय संरक्षणविषयक संशोधन आणि विकास कार्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

संरक्षण विषयक संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत यांनी आयटीसीएमच्या उड्डाणाच्या यशासाठी डीआरडीओच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

५१ हजाराचा गुटखा जप्त…एक जण गजाआड

Next Post

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले

India Darpan

Next Post
GLcQZBcasAAmGXc e1713450665341

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011