नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रतिबंधीत गुटखा बाळगणा-या एकास पोलीसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातून ५१ हजार रूपये किमतीची सुगंधी तंबाखू आणि पानमसाला असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ खाजाहुसेन शेख (रा.स्वारबाबानगर,क्रांतीचौक सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अमंलदार सागर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. सिबल फर्निचर पाठीमागील मिलींदनगर कडे जाणा-या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या ताब्यात ५० हजार ९५९ रूपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.