इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये खा. संजय राऊत यांची जीभ घसरली. या वेळी खासदार नवनीत राणा यांचा उल्लेख त्यांनी नाची, डांसर आणि बबली असा केला.
या प्रचाराच्या सभेत राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणूक देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही, तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी ज्या बाईने मातोश्रीला आव्हान दिले. मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले नैतिक कर्तव्य आहे. अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असले पाहिजे.