नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर देश-विदेशांत रस्ते आणि पुलांचे निर्माण करणाऱ्या अशोका बिल्डकॉनने आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (एचएसइ) या श्रेणींचा प्राधान्याने विचार केला आहे. अशोकाच्या याच पर्यावरणस्नेही उपक्रमशील धोरणाबाबतच्या सजगतेची दखल घेऊन सुप्रसिध्द सीआयडीसी समुहाच्या वतीने विश्वकर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजस्थानमधील जोधपूर येथे अशोका बिल्डकॉनतर्फे साकारण्यात आलेल्या फिनटेक डिजीटल इन्स्टिट्यूटसाठी सदर पुरस्कार देण्यात आला. अशोकाच्या वतीने सुप्रियो कुमार दास यांनी पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी सीआयडीसी समुहाचे चेअरमन डॉ. पी. एस. राणा, सचिव तथा डायरेक्टर जनरल डॉ. पी. आर. स्वरूप हे उपस्थित होते.