नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मृत व्यक्तींच्या जागी बनावट इसम उभे करून भूखंडाची परस्पर खरेदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातबारा उता-यावर नवीन खरेदी खतानुसार नावे लागल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान अशोक अहिरे व त्याचे साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत निर्मला विनोद काळे (रा.मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. काळे यांच्या मृत सासू सास-याच्या नावे चुंचाळे शिवारात भूखंड आहे. २००९ मध्ये संशयिताने मृत सासू सास-याच्या जागी बनावट व्यक्ती उभे करून दुय्यम निबंधक कार्यालयात परस्पर सर्व्हे नंबर ६४ – अ प्लॉट १४० या पैकी प्लॉट नंबर १४० क्षेत्र ४४० चौरस मिटर भूखंड खरेदी केली.
त्यासाठी बनावट आधार व पॅनकार्ड चा वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
…..