माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- अवकाळीचे वातावरण– मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्यापासून (१९-२६ एप्रिल ) आठवडाभर ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र उद्या-परवा (१९-२०) तसेच (२३-२४) एप्रिलला अवकाळीची तीव्रता कमी जाणवेल.
२- उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा– संपूर्ण महाराष्ट्रात उद्या १९ एप्रिल पासून उष्णतेच्या लाटेचा व रात्रीच्या उकाड्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता जाणवते.
३- किनार पट्टीवरील दमटयुक्त उष्णता-.मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उद्या १९ एप्रिललाही दमटयुक्त उष्णतेची स्थिती टिकून असेल..
इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.