नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझ्याशी बोलत नाही या रागातून तरूणाने घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार पेठरोडवरील कर्णनगर भागात घडला. या घटनेत महिलेच्या घरातील वस्तूंची संशयिताने तोडफोड केली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित वड (२० रा.कर्णनगर,आरटीओ समोर ) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून बुधवारी (दि.१७) महिला घरात एकटी असतांना संशयिताने घरात घुसून माझ्याशी का बोलत नाही या कारणाचा जाब विचारला.
यावेळी संतप्त तरूणाने पीडितेस शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तसेच घरातील फर्निचर आणि मोबाईलची तोडफोड केली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.