इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उमेदवारी अर्ज भरतांना शक्तीप्रदर्शन करण्यात आता नवलाई उरली नाही. प्रत्येक पक्ष त्याच्या ताकदीप्रमाणे ते करत असतो. पण, उमेदवारी अर्ज भरतांना आपले लक्ष वेधून घेण्याची कला फार कमी लोकांमध्ये असते. माढा लोकसभा मतदार संघातून राम गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरतांना असे काहीसे वेगळे केले. त्यामुळे त्यांची चर्चा इतर उमेदवारांपक्षा जास्त झाली. ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. त्यावेळेस त्यांनी यमाची वेश धारण केला होतो.
गायकवाड हे मराठा समाजाचे राज्य समन्वयक आहेत. या त्यांच्या वेशाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, देशामध्ये बोकळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढा-यांची मग्रुरशाही, हे देवाधिकांना घाबरत नाहीत. ही सगळी लोकं आता फक्त यमाला घाबरणार म्हणून यमाच्या अवतारात आलो. यम हा शेवटचा टोक असतो. या यमाच्या शेवटच्या टोकावर आम्ही इथे आलो आहोत. आम्ही आज लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारी लोकांना संपविण्यासाठी आम्ही यम म्हणून आलेलो आहोत. असे गायकवाड यांनी सांगितले.