इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमधील नाशिक, छत्रपती संभाजी नगर व ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला असून या तिन्ही जागेवर शिवसेना शिंदे गट उमेदवारांची घोषणा आज मंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषद घेऊन करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर निर्णय होत नव्हता. नाशिकच्या जागेवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने दावा केला. तर छत्रपती संभाजी नगर व ठाणे येथे भाजपने केला होता. पण, रात्री या तिन्ही जागेचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना शिंदे गटातर्फे नाशिकमध्ये विद्यमान खा. हेमंत गोडसे, छत्रपती संभाजी नगरमध्ये मंत्री संदीपान घुमरे तर ठाणे येथ आमदार प्रताप सरनाईक या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचेही बोलले जात आहे.
महायुतीत आतापर्यंत भाजपने २४, शिंदे गटाने ९ व राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४ व एक जानकरांची अशी ५ जागेची घोषणा केली आहे. आज कोणत्या पक्षाला किती जागा मिळते हेही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होणार आहे.