इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सांगली पाठोपाठ शिर्डीतही महाविकास आघाडीला फटका बसला आहे. लोकसभेच्या जागावाटपात महाविकास आघाडीने शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरेंना शिर्डीतून तिकिट दिलं आहे. त्यामुळे नाराज रुपवतेंनी पक्ष सोडला आहे.
रुपवते या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन त्या उमेदवारी करणार आहे. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असून त्याचा फटका आता कोणाला बसतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी केली होती. पण, महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाला गेल्यामुळे त्यांची अडचण झाली.
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा राखीव असून या ठिकाणी शिंदे गट व ठाकरे गटात सामना होणार आहे. त्यात आता वंचितच्या इंन्ट्रीमुळे येथील गणित बिघडणार आहे.