इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः बोलतांना संयम राखायला हवा, पण, काही जण तो राखत नाही. त्यामुळे काहीवेळा काही वक्तव्य त्यांच्या अंगावर येथे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाने असाच झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने त्याच्या निवडणूक प्रचारावर ४८ तास बंदी घातली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाने सुरजेवाला यांच्यावर प्रचार आणि कोणत्याही प्रकारची मुलाखत देण्यास ४८ तासांची बंदी घातली आहे. मिरवणुका, सार्वजनिक रॅली, रोड-शो आणि मुलाखती, प्रसारमाध्यमांमधील सार्वजनिक भाषणे प्रतिबंधित केली आहेत.
सुरजेवाला यांनी हेमामालिनी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने सुरजेवाला यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते. सुरजेवाला यांनी उत्तर दिले होते, की ज्या व्हिडिओबाबत तक्रार करण्यात आली आहे, त्यात छेडछाड करण्यात आली आहे.