इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीः अमरावती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा त्यांचे पती रवी राणा हे कट्टर विरोधक अडसूळ यांच्या घरी गेले. त्यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत यांची भेट घेतली.
या भेटीनंतर अभिजीत अडसूळ म्हणाले की, राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो. कायमचा मित्र नसतो. पाहुणे घरी आले की, त्यांचे आपण स्वागत करतो. तसेच स्वागत आम्ही राणा दांपत्याचे केले. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका ठरवू, असे अडसूळ यांनी सांगितले.
अडसूळाच्या टीकेनंतर भेट
लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी लढवावी लागेल. सर्व मतदार बूथपर्यंत आणले पाहिजे. मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका, २०१९ मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते. एवढी मोठी यंत्रणा असूनही एका पक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमात राहू नये, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. आनंदराव अडसूळ यांनी बुलडाण्यात बोलताना नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. राणा यांच्यात अडाणीपणा आहे. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली असे त्यांना वाटते. मी त्या नवरा-बायकोला बंटी बबली म्हणतो, अशा शब्दांत त्यांनी राणा दांपत्यावर टीका केली.
त्यानंतर राणा यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. व्हिडिओ एडिट करून विरोधकांकडून चुकीची बातमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी यांची हवा होती आणि राहील. देशाच्या प्रगतीसाठी मोदी हे आवश्यक आहेत, असे त्या म्हणाल्या.