रामटेक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या भूमीवर रामनवमीच्या दिवशी रामाचा धनुष्य-बाण घेऊन आलो आहे. हाच धनुष्य बाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे, असा विश्वास शिवसेनचे मुख्य नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे राजू पारवे यांना मिळालेले प्रत्येक मत मोदीजींसाठी असेल.
बुधवारी उमरेड शहरातील गांगापूर चौकात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनसंवाद रथ यात्रेचे सुरुवात करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत सुरुवात झालेल्या बाईक रॅली शहरातील मुख्य ठिकाणाहून काढण्यात आली. तर जागो-जागी मुख्यमंत्र्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, रामटेक लोकसभा निवडणूक क्षेत्राचे महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू पारवे, आमदार टेकचंद सावरकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, माजी मंत्री सुबोध मोहिते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (भाजपा) सुधाकर कोहळे, माजी आमदार आशीष देशमुख, शिवसेनेचे जेष्ठ नेते व रामटेक लोकसभेचे निरीक्षक नगरसेवक मंगेश सातमकर (मुंबई), शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, शिवेसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार आदि नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचार जनसंवाद रथ यात्रेत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, सदस्य तथा पदाधिकारी, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, नगर सेवक-सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रामटेकचा खासदार राजू पारवे हा नंबर एकवर राहणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज मोदीजी हे जगातील नंबर एकचे लोकप्रिय नेते झाले आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. म्हणून देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हवे. त्यामुळे ही निवडणूक मोदीजींची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक महिलांच्या आत्मसन्मानाची आहे, ही निवडणूक जनतेच्या फायद्याचे असलेल्या विकासाची आहे. एकीकडे मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली आघाडी त्यांना पराभूत करण्याचा फास रचत आहे. ना त्यांच्याकडे झेंडा आहे ना अजेंडा आहे. ना त्यांच्याकडे काम करण्याची निती, नियत ना निर्णय घेण्याचे धाडस आहे. तर मोदीजींकडे देशाच्या विकासाचा, प्रगतीचा आणि जनतेला न्याय देण्याचा अजेंडा आहे. राज्यात अबकी बार 45 पार जागा आपल्याला मिळवायच्या आहेत. यात राज्यातील निवडूण येणाऱ्या जागांमध्ये तुमचा रामटेकचा होणारा खासदार राजू पारवे हा नंबर 1 वर असला पाहिजे.
भर उन्हात मुख्यमंत्र्यांचे स्वागत
उमरेड शहरातून जनसंवाद रथ यात्रेतील चित्र बघून मी भारावलो. महिला, पुरुष, तरुण भर उन्हात माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे होते. कुणी रांगोळी काढली, पुष्पवर्षाव केला. लोकांचे प्रेम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी दिसून आले. आज जे जागो जागी झालेल्या स्वागत हे रामटेकचा धनुष्य बाण हा दिल्लीत नेणारच. आपण दिलेल्या आशिर्वादाने मी भारवल्याचेही भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 19 एप्रिल 2024 रोजी सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करून पारवे यांना निवडून द्यावे. त्यामुळे ‘धनुष्य बाण रामाचा’ आणि ’राजू पारवे आहे कामाचा’ असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण करत महायुतीच्या कार्यकर्त्यांची अलोट गर्दी तर चौकामध्ये मुख्यमंत्र्यांचे औक्षण करण्यात आले.
‘धनुष्य बाण रामाचा’; ’राजू पारवे कामाचा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमरेड व हिंगणा येथे जनसंवाद रथ यात्रा प्रचार रॅलीत सहभागी झालेत. प्रचंड तापमानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाईकवर राजू पारवे यांना बसवून रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगलाच उत्साह वाढविला. भर उन्हात तापमान बघता चहा घेण्यासाठी ते एका चहाच्या दुकानाला ही त्यांनी भेट दिली. याठिकाणी प्रसारमाध्यामांशी त्यांनी चहा घेत चर्चा केली. यावेळी चहाची पार्टी स्वत: मुख्यमंत्र्यांनी देत दुकानाराला चहाचा खर्च दिला. गंगापूर चौकातून निघालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनसंवाद रथ यात्रा पुढे आझाद चौक, अशोक विद्यालय चौक, जीवन विकास चौक, उमरेड पोलिस स्टेशन, भिसी नाका चौक, बायपास चौक, भिसी नाका चौक, इतवारी मेन मार्केट, जुना मोटार स्टँड, श्रीराम टॉकीज मार्गाने श्री. राम मंदीर (मारवाडी) देवस्थानात रॅलीचा समारोप झाला.