रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जॉर्जियात युरोपियन गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने पटकावली २ रौप्य आणि २ कांस्य पदके

by Gautam Sancheti
एप्रिल 17, 2024 | 7:55 pm
in राष्ट्रीय
0
DAE10L2S

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जॉर्जियात स्काल्तुबो येथे आयोजित मुलींसाठीच्या १३ व्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड (ईजीएमओ), २०२४ मध्ये भारतीय संघाने प्रशंसनीय कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. भारताच्या चार सदस्यीय संघाने २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली आहे. पदकविजेतेमध्ये सई पाटील (कांस्य), लॅरीस्सा (कांस्य), संजना फिलो चाको (रौप्य), गुंजन अगरवाल (रौप्य) यांचा समावेश आहे.

चेन्नई मॅथेमॅटीकल इन्स्टीटयूटचे साहिल म्हसकर (प्रमुख), अदिती मुथखोड (उपप्रमुख) आणि अनन्या रानडे (निरीक्षक) यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले असून त्यांचे मार्गदर्शन आणि मदत भारतीय पथकाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. वर्ष 2015 मध्ये भारतीय संघाने ईजीएमओ मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता, त्यानंतर या स्पर्धेत उतरलेल्या सर्वच्या सर्व चारही स्पर्धकांनी पदके मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.

गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच कनिष्ठ विज्ञान या विषयांतील ऑलिम्पियाड कार्यक्रमांसाठी भारतातील नोडल संस्था म्हणून काम करणाऱ्या टीआयएफआर- होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) या यशाचे श्रेय याआधीच्या स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंचे समर्पित प्रयत्न, तसेच एचबीसीएसई तर्फे ईजीएमओ प्रशिक्षण शिबिराच्या (ईजीएमओटीसी) माध्यमातून स्पर्धकांना देण्यात आलेले संरचित प्रशिक्षण आणि ऑलिम्पियाड कार्यक्रमाच्या कालावधीत केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील राष्ट्रीय उच्चस्तरीय गणित मंडळातर्फे देण्यात आलेला सातत्यपूर्ण पाठींबा या सर्व घटकांना दिले आहे.

केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) -टीआयएफआर ही प्रमुख संस्था भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच गणित या विषयांतील प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या प्रतिभावंत स्पर्धकांची निवड करुन, योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना या स्पर्धांसाठी तयार करण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते. त्यासाठी भारत सरकारतर्फे मान्यताप्राप्त आणि सरकारच्या पाठबळाने एचबीसीएसई अत्यंत काळजीपूर्वक राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा म्हणजे स्पर्धकांना विविध टप्प्यांतून प्रगती करत अंतिम संघात प्रतिष्ठित स्थान निश्चित करण्यासाठीचा मार्ग आहे.

ईजीएमओ २०२४ साठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे उद्या, 18 एप्रिल, 2024 रोजी पहाटे मुंबईत आगमन होणार आहे. भारतीय संघाने मिळवलेले हे यश साजरे करण्यासाठी एचबीसीएसईच्या मुख्य इमारतीत खोली क्र.जी 1 मध्ये उद्या, 18 एप्रिल, 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मद्यधुद त्रिकुटाने केली मारहाण…१८ वर्षीय युवक जखमी

Next Post

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर डिझेलची कथित तस्करी… मासेमारी बोट रोख रकमेसह ताब्यात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1200px Indian Coast Guard Logo.svg

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर डिझेलची कथित तस्करी… मासेमारी बोट रोख रकमेसह ताब्यात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गर्दीचे ठिकाणी टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, ३ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 2, 2025
Lodha1 1024x512 1

या अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

ऑगस्ट 2, 2025
rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011