इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील गहुंजे इथल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज भारताचा बांग्लादेश विरुद्ध सामना रंगणार आहे. या स्पर्धेत भारताने जरी ऑस्ट्रेलिया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचा पराभव केलेला असला तरी त्यांना या सामन्यात बांग्लादेश संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही. काही मुख्य स्पर्धांमध्ये बांगलादेशने नेहमीच भारताविरुद्ध अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे.
आजच्या सामन्यात स्टेडियम हे लहान आकाराचे आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असून धावा करणे खूप सोपे आहे. येथे सहज मोठे फटके मारता येतात. आता हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होणार असून दीड वाजता नाणेफेक होईल त्यानंतर कोणता संघ फलंदाची करतो हे स्पष्ट होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आतापर्यंत ७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये संघांनी ८ वेळा ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणा-याला ३०० च्या आसपास धावा कराव्या लागणार आहे.
या विश्वचषकात भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताला पहिल्या स्थानापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विश्वचषकासाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.