नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज श्रीराम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात महायुतीमधील नाशिक लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे व मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही दर्शनासाठी आले होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या पाया पडून केला नमस्कार केला. गोडसे आणि भुजबळ दोन्हीही नाशिक मधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा चांगलची रंगली. या भेटीबाबत भुजबळ म्हणाले की, हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. आज राम नवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली असून उमेदवारही घोषीत केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचारही सुरु केला. तरी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. या ठिकाणी जागा कोणत्या पक्षाला जाईल हेच कोणाला माहित नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. त्यातत ही दोन्ही इच्छुक उमेदवारांची भेट झाल्यामुळे ती चर्चेची ठरली.